logo
dicgc
आपले नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित मध्ये स्वागत आहे
इतिहास

दि. २२-०९-१९२० रोजी म्हणजे भारत स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वीच महसुल विभागातील कर्मचारी कै. एम. आर .देशपांडे यांच्या प्रगल्भ कल्पनेतून सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना आपल्या आर्थिक अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने मदत व्हावी यासाठी बँकेची दिंडोरी येथे स्थापना करण्यात आली. सुरुवातीला बँकेचे नाव 'नाशिक गर्व्हमेन्ट सर्व्हन्टस् म्युच्युअल हेल्प अॅण्ड प्राॅव्हीडेन्ट को ऑप क्रेडीट सोसायटी लि.' असे होते त्यानंतर दि.२२ जून १९५६ रोजी सदरच्या नावात बदल करून ते 'दि गर्व्हमेन्ट सर्व्हन्टस् को. ओप. क्रेडीट अर्बन बँक लि.' असे ठेवण्यात आले . मात्र त्यात पुन्हा  बदल करून ते ' नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित , नाशिक' असे करण्यात आले. आज देखील याच नावाने बँकेचे कामकाज चालू आहे. बँकेस रिझर्व्ह बँकेकडून दि.१६/०१/२०१० रोजी लायसेन्स प्राप्त झाले असून त्याचा क्रमांक UBD .MUM (MAH) 0038 /P2009 -10 दिनांक १६/०१/२०१० असा आहे तर बँकेचा सहकार खात्याकडील नोंदणी क्रमांक ३१०७ हा आहे . आज बँकेचे राज्य सरकार व जिल्हा परिषद ( पोलीस व शिक्षक सेवेतील कर्मचारी वगळून ) इतर सर्वच कार्यालयातील कर्मचारी हे बँकेचे सभासद आहेत व बँकेच्या विविध सेवेचा ते लाभ घेत आहेत.
Copyright © Netwin Systems & Software (I) Pvt. Ltd. All Rights Reserved