बँकेत कोणत्याही सज्ञान व्यक्तीस तसेच सभासदास बचत खाते उघडता येते. सदर खात्यावर कितीही वेळा पैसे जमा करू शकतो मात्र आठवडयातून दोन वेळेसच पैसे काढता येतात. सदर खात्यावर कमीत कमी १०००/- रुपये इतकी जमा शिल्लक ठेवावी लागते . सदर खात्याचे दैनदिन शिल्लकेवर 3.५% वार्षिक दराने दर सहा महिनेस व्याज आकारणी होऊन व्याज खात्यावर जमा केले जाते. बचत खाते हे वैयक्तिक तसेच संयुक्त देखील उघडता येते.
बचत खातेसाठी आवश्यक कागदपत्रे
१. बँकेच्या विहित नमुन्यातील अर्ज सर्व तपशिलासह भरावा.
२. अर्जासोबत २ फोटो
३. पॅन कार्ड झेरॉक्स
४. पत्ता पुराव्यासाठी - आधार कार्ड , ड्रायव्हींग लायसेन्स, मतदार ओळखपत्र , शासकीय ओळखपत्र यापैकी कोणतेही एक दस्तऐवज.
५. सुरुवातीस रोखीत रु.१०००/- भरणे आवश्यक राहील